नागपुरात भाजपकडे इच्छुकांचा महापूर; एका जागेसाठी 10 उमेदवार, शहर अध्यक्षांनी मित्रपक्षांना घातली अट..

Dec 22, 2025 - 13:46
Dec 23, 2025 - 14:55
 0  2
नागपुरात भाजपकडे इच्छुकांचा महापूर; एका जागेसाठी 10 उमेदवार, शहर अध्यक्षांनी मित्रपक्षांना घातली अट..

 नागपूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून (Election Date 2026) मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका जाहीर होताच सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. अशातच नागपूरमध्ये भाजपकडे इच्छुकांचा अक्षरशः महापूर लोटल्याचे चित्र आहे. एका जागेसाठी तब्बल 10 इच्छुक उमेदवार रिंगणात असल्याची माहिती समोर आली आहे.

             महापालिकेच्या 151 जागांसाठी 1489 अर्ज -  नागपूर महानगरपालिकेतील 151 जागांसाठी भाजपकडे 1489 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली असून, गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात या मुलाखती घेतल्या जात आहेत.
प्रत्येक इच्छुकाला भाजपच्या 19 सदस्यीय मुलाखत समितीसमोर प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महायुती होणार, पण जागांची मागणी क्षमतेनुसारच – दयाशंकर तिवारी

          भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी बोलताना मित्रपक्षांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले की, “भाजप महायुतीसाठी तयार आहे. मित्रपक्षांशी युती केली जाईल, मात्र त्यांनी आपली क्षमता, ताकद आणि मागील निवडणुकीतील कामगिरी पाहूनच जागांची मागणी करावी.

         ”तिवारी यांनी यावेळी मागील निवडणुकांचा दाखला देत सांगितले की,एकसंघ शिवसेनेचे मागील वेळी फक्त 2 नगरसेवक,तर राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त 1 नगरसेवक निवडून आला होता.त्यामुळे यंदाही मित्रपक्षांनी वास्तवाचा विचार करूनच जागावाटपाबाबत भूमिका घ्यावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी तीव्र चुरस - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या पाहता भाजपसमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow