नागपूर महापालिका निवडणूक 2026 : महायुतीसाठी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह, उमेदवारी अर्जांची गर्दी वाढली..
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती घडवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. भाजपच्या निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांनी सांगितले की, आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीसाठी प्रयत्न करत आहेत. मित्र पक्षांनी जागांसंदर्भात सामंजस्य दाखवल्यासच नागपुरात महायुती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या नागपूरात मित्र पक्षांसोबत महायुतीसाठी चर्चा सुरू आहे.भाजपमध्ये सध्या 151 जागांपैकी 108 नगरसेवक आहेत. मित्रपक्ष शिवसेनेचे दोन नगरसेवक असून, शिवसेनेने भाजपकडे 50 जागांची मागणी केली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर महापालिकेत एक नगरसेवक असून, त्यांनी किमान 15% जागांची मागणी केली आहे.मित्रपक्षांच्या जास्त जागांच्या मागणीचा प्रश्न भाजपसाठी महत्त्वाचा ठरत आहे.दुसरीकडे, महापालिकेच्या विविध झोन कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच पहिल्या तासात मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.
नागपूर महानगरपालिकेसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सर्व दहा झोन कार्यालयांमध्ये सुरू झाली आहे.भाजप, काँग्रेस तसेच प्रादेशिक आणि छोटे पक्ष देखील मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज घेऊन जात आहेत.विविध पक्षांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून इच्छुक उमेदवार त्यांच्या अधिकृत यादीची वाट पाहत आहेत.संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी विविध पक्ष उमेदवारांची यादी उशिरा जाहीर करणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आताच अर्ज दाखल केला आहे.या पार्श्वभूमीवर नागपूरात उमेदवारी अर्ज घेण्याची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.महायुतीसाठी जागावाटप आणि उमेदवारी अर्ज घेण्याच्या प्रक्रियेला आता शहरभर लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?