Mahayuti Seat Sharing : विदर्भात महायुतीवर शिक्कामोर्तब, नागपूरसह चार शहरांत भाजप–शिंदेसेना एकत्र..

Dec 27, 2025 - 12:25
 0  1
Mahayuti Seat Sharing : विदर्भात महायुतीवर शिक्कामोर्तब, नागपूरसह चार शहरांत भाजप–शिंदेसेना एकत्र..

नागपुर : विदर्भातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.नागपुरात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

            नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चारही प्रमुख शहरांमध्ये भाजप–शिवसेना महायुती निवडणूक रिंगणात उतरणार आहे.यापैकी चंद्रपूर आणि अकोला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा भाग असणार असल्याची माहिती आहे.मात्र नागपूर आणि अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गुरुवारी नागपुरात भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीत विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती करण्यावर तत्वतः सहमती झाली आहे.

           उपराजधानी नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम पिच मानले जाते.याआधी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने विदर्भात दमदार कामगिरी केली होती.त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही महायुती आत्मविश्वासात असल्याचे चित्र आहे.विदर्भातील या निर्णयामुळे राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, विरोधकांसमोर महायुतीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.आता या युतीचा थेट परिणाम नागपूरसह संपूर्ण विदर्भातील निवडणूक लढतीवर दिसून येण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow